१२५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून घेतला काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:30+5:302021-01-08T05:12:30+5:30

सांगोला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या ६५९ जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत १२५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून काढता पाय ...

1253 candidates withdrew from the election arena | १२५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून घेतला काढता पाय

१२५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून घेतला काढता पाय

Next

सांगोला : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या ६५९ जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत १२५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून काढता पाय घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या १२० सदस्यांना प्रभागात अन्य कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांच्या माथी बिनविरोधाचा गुलाल लागला आहे. आता ५६ ग्रामपंचायतींच्या ५३९ जागांसाठी २०५ प्रभागांतून १२१० उमेदवार नशीब अजमावत आहेत.

६१ ग्रामपंचायतींच्या २३७ प्रभागांतील ६५९ जागांसाठी १२७९ उमेदवार प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मेथवडे, चोपडी, वाटंबरे, गायगव्हाण, तिप्पेहाळी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ५६ गावांची निवडणूक होत आहे. यात १२७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरलेल्या २५९६ उमेदवारांपैकी १२० उमेदवार नशीबवान ठरले आहेत.

--

बिनविरोध ग्रामपंचायत व सदस्य

वाटंबरे १३, मेथवडे ९, इटकी २, उदनवाडी ६, नराळे ४, बुद्धेहाळ ३, संगेवाडी ५, बामणी ७, तिप्पेहाळी ९, कोळा ३, हटकर मंगेवाडी १, सोमेवाडी ५, जुनोनी (काळूबाळूवाडी) ६, गायगव्हाण ७, मानेगाव २, निजामपूर १, हणमंतगाव १, चोपडी १३, अजनाळे १०, कमलापूर १, मेडशिंगी १, वाकी घेरडी ७, लोटेवाडी १, यलमर मंगेवाडी २, तरंगेवाडी १ अशा २४ ग्रामपंचायतींचे १२० उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

Web Title: 1253 candidates withdrew from the election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.