७२ ग्रामपंचायतींसाठी १,३२७ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:30 AM2020-12-30T04:30:22+5:302020-12-30T04:30:22+5:30
२३ डिसेंबरपासून ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर सलग तीन सुट्या आल्यामुळे सोमवारपासून शेवटच्या ...
२३ डिसेंबरपासून ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर सलग तीन सुट्या आल्यामुळे सोमवारपासून शेवटच्या तीन दिवसांत अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मंगळवारी दिवसभर पंढरपूर तहसीलचे धान्य गोडाऊन, पंचायत समिती शेतकरी भवन, तहसीलचे रायगड भवन व आवारात अशा चार ठिकाणी एकाचवेळी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवाराची संख्या मोठी होती. त्यामुळे दुपारी ३ वाजता गेटच्या आत आलेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम रात्री ८ वाजेपर्यत चालू होते.
तालुक्यातील कासेगाव, करकंब, भोसे, गादेगाव, भाळवणी, पटवर्धन कुरोली, सुस्ते, खर्डी, सरकोली, रोपळे आदी महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यापैकी भोसे ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीकडे वाटचाल सुरू आहे.