सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 'कोरोना' बाधितांची संख्या आज २२ ने वाढून ३३० इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या १ नं वाढून २२ झाली आहे.
आज एका दिवसात १२१ जणांचे अहवाल प्राप्त झाले यात ९९ निगेटिव्ह तर २२ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात ८ पुरूष आणि १४ महिलांचा समावेश आहे. एक महिला मृत पावली आहे.
आत्तापर्यंत एकूण ३७१३ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील ३४८१ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ३१५१ निगेटिव्ह तर ३३० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या २२ इतकी आहे. तर केगांव क्वारंटाईन सेंटरमधून ८८ जणांना सोडण्यात आले.
आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांत १८१ पुरूष तर १४९ महिलांचा समावेश आहे. तर मृत २२ मध्ये ११ पुरूष, ११ महिलांचा समावेश आहे.
आता पर्यंत एकूण १०६ जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं आहे. आज जी महिला मृत पावली ती ६५ वर्षिय सूलतानपूर उस्मानाबाद येथील आहे. नई जिंदगीत नातेवाईकांकडे ती १८ मार्चला आली होती. १२ मे रोजी त्रास होवू लागल्यानं सिव्हीलमध्ये उपचारासाठी आली. सायंकाळी तिचा मृत्यू झाला.