पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील २३ गावांना मिळणार सव्वादोन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:03+5:302021-04-30T04:27:03+5:30

ग्रामीण भागातील प्रमुख गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, वाड्यावस्त्यांवरील रस्ते खडीकरण व मुरमीकरण करणे तसेच पेव्हरब्लॉक बसविणे, भुयारी गटारे दुरुस्ती करणे, ...

23 villages in Pandharpur, Malshiras talukas will get a fund of Rs | पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील २३ गावांना मिळणार सव्वादोन कोटींचा निधी

पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील २३ गावांना मिळणार सव्वादोन कोटींचा निधी

Next

ग्रामीण भागातील प्रमुख गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, वाड्यावस्त्यांवरील रस्ते खडीकरण व मुरमीकरण करणे तसेच पेव्हरब्लॉक बसविणे, भुयारी गटारे दुरुस्ती करणे, सामाजिक सभागृह बांधणे यासारखी अनेक विकासकामे करण्याकरिता शासनाकडे निधी मिळण्यासाठी मागणी केलेली होती. त्यानुसार, शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील विकासकामांसाठी २ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहे.

यामध्ये पंढरपूर तालुक्यातील जळोलीसाठी १० लाख, कान्हापुरी १० लाख, सांगवी-१० लाख, चिंचणी-१० लाख, नेमतवाडी- १० लाख, पेहे-१० लाख, टाकळी (पु)-जळोली - १० लाख, वाडी-कुरोली -१० लाख, खेड-भोसे -१० लाख, खरातवाडी- १० लाख, अजोती - १० लाख, ना. चिंचोली - १० लाख, भटुंबरे - १० लाख, भटुंबरे उजनी वसाहत - ७ लाख, सुगाव (खेडभोसे)- १० लाख, तरटगाव - ७ लाख, बादलकोट- ५ लाख, उजनी वसाहत (पट-कुरोली) - ९ लाख तसेच माळशिरस तालुक्यातील लवंग - १३ लाख, वाघोली - १० लाख, वाफेगाव - १० लाख, उंबरे (वे) - १० लाख, कोंढारपट्टा - १० लाख असा एकूण २ कोटी २१ लाख रुपयांचा निधी विकासकामासाठी मंजूर झालेला आहे.

या निधीची तरतूद करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे निधीची तरतूद झाली असल्याने मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार असून मंजूर झालेली कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.

--------

Web Title: 23 villages in Pandharpur, Malshiras talukas will get a fund of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.