अक्कलकोट तालुक्यातील २७ हजार कार्डधारकांना रेशन मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:52+5:302021-09-16T04:28:52+5:30
अक्कलकोट तालुक्यात १७९ रेशन दुकानदारांना परवानगी देण्यात आले आहे. मागील १५ वर्षांपूर्वी शासनाने त्रिकार्ड योजना अंमलात आणली. तेव्हा परिस्थितीनुसार ...
अक्कलकोट तालुक्यात १७९ रेशन दुकानदारांना परवानगी देण्यात आले आहे. मागील १५ वर्षांपूर्वी शासनाने त्रिकार्ड योजना अंमलात आणली. तेव्हा परिस्थितीनुसार एकाच कुटुंबातील अनेक नव्याने कुटुंब तयार झाले असले, तरी त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते. त्यावेळी राज्य शासन कार्ड फोड करून घेण्याची मुभा दिली होती. त्यावेळी अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असूनही कार्ड वेगळे करून घेतल्याने त्यांना केसरी कार्ड देण्यात आले. यामुळे पूर्वीच्या कार्डामधून नावे कमी करण्यात आले. त्यानंतर त्यांना पूर्वीच्या कार्ड आणि नवीन कार्डावरही धान्य मिळणे बंद झाले. यामुळे गरजू असूनही २७ हजार ६००० कुटुंबधारकांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनही कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे नवीन कार्ड फोड करून पश्चात्ताप होत असल्याचे प्रतिक्रिया कुटुंबधारकांतून व्यक्त होत आहे.
कोट :- मला १५ वर्षांपूर्वी तलाठ्याकडून केसरी रेशन कार्ड मिळाले आहे. तेव्हापासून आजही रेशन धान्य मागण्यासाठी रेशन दुकानाला दर महिना जात असतो. केसरी कार्डला वरूनच धान्य आले नसल्याचे सांगितले जाते. मी टेम्पोचालक आहे. केवळ माझ्याकडे केसरी कार्ड आहे म्हणून धान्य मिळत नाही.
-शिवपुत्र रेऊरे, रामपूर
.........................
अन्नसुरक्षा योजनेमधून प्रत्येक गावातील कमी उत्पन्न घटकातील लोकांचे नावे ग्रामसभेत ग्रामपंचायतीने एकमताने ठराव करून तहसील कार्यालयाकडे पाठवून दिल्यास त्या यादीला मंजुरी देऊन त्यांना अन्नसुरक्षा योजनेचा फायदा देता येतो. तशा प्रत्येक गावातील अधिक अधिक ७६ टक्के लोकांना या योजनेत सहभाग करता येतो. यामुळे रेशन धान्याचा प्रश्न मार्गी लागते.
- बाळासाहेब शिरसट, तहसीलदार