पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ११५ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ४६ ऑक्सिजन चालू आहे. डॉ. अरविंद गिराम २००९-१० मध्ये एका ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेले होते. या दरम्यान त्यांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या रुग्णांना योग्य प्रकारे व आवश्यक तेवढा ऑक्सिजनपुरवठा कशा पद्धतीने केला जाईल, याचे मार्गदर्शन मिळाले होते. त्या दरम्यानच त्यांना नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. यामुळे नागरिकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. यामुळे त्यांनी ऑक्सिजनचा योग्य वापर व्हावा, या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयातील ३९ जणांना नॉन रीब्रीथर मास्क लावून ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे ऑक्सिजन लावलेला रुग्ण श्वास घेतो, तेव्हा तो पिशवीमधून ऑक्सिजनमध्ये श्वास घेत आहात. मास्कच्या बाजूला असलेल्या वायूमधून श्वास बाहेर टाकलेली हवा बाहेर पडते आणि परत वातावरणात जाते. यामुळे ऑक्सिजन वाया जात नाही. तसेच फक्त त्या माणसाच्या शरीरात ऑक्सिजनच जातो. या पद्धतीने रोजच्यापेक्षा आता ४० टक्के ऑक्सिजन वाचला जात आहे. हे सर्व काम डॉ. अरविंद गिराम, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. सचिन वाळुजकर, डॉ. शिव कमल, परिचारिका जयश्री बोबले, रेखा ओंबासे, नाडगौडा करत आहेत.
------
आता फक्त ५० ऑक्सिजन सिलिंडर लागतात
उपजिल्हा रुग्णालयात ५० च्या आसपास कोरोना रुग्णांना रोज कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी किमान रोज ९० ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असते. परंतु, नॉन रीब्रीथर मास्कचा वापर सुरू केल्यापासून तेवढ्याच रुग्णांना सध्या ५० ऑक्सिजन सिलिंडर लागत असल्याचे डॉ. अरविंद गिराम यांनी सांगितले.
------
नॉन-रीब्रीथर मास्क म्हणजे काय?
नॉन-रीब्रीथर मास्क एक वैद्यकीय डिव्हाइस आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन वितरित करण्यात मदत करते. त्यात पिशवीत कनेक्ट केलेला फेस मास्क असतो, जो ऑक्सिजनच्या एकाग्रतेने भरलेला असतो. पिशवी ऑक्सिजन टाकीशी जोडलेली आहे.
-----
उपजिल्हा रुग्णालय येथे नॉन रीब्रीथर मास्कचा वापर करून ऑक्सिजन घेताना महिला रुग्ण.