यासह समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे, परिचारक समर्थक नागेश भोसले यांच्यासह अब्दुल मुलाणी (पंढरपूर), संजय पाटील (ब्रम्हपुरी), अशोक वाघमोडे (करमाळा), अभिजित आवाडे-बिचुकले (सातारा), अमोल माने (धर्मगाव-मंगळवेढा), सतिश जगताप (काकण-इंदापूर), पोपट धुमाळ (बोहाळी), सुरेखा गोरे (फुरसंगी-पुणे), सीताराम सोनवणे (सोलापूर), सिध्दाराम काकणकी (सिध्दापूर), शितल आसबे (गोपाळपूर), बळीराम बनसोडे (चळे), किशोर जाधव (गोपाळपूर), सुधाकर बंदपट्टे (पंढरपूर), मोहन हाळवणकर (ईश्वरवठार), रामचंद्र सलगर (धर्मगाव-मंगळवेढा), कपिल कोळी (सोलापूर), सुदर्शन मसुरे (पुसेवाडी), राजाराम भोसले (वाढेगाव), मनोज पुजारी (ब्रम्हपुरी), सुदर्शन खंदारे (पंढरपूर), सिध्देश्वर आवारे (मलिकपेठ), बिराप्पा गोरे (तनाळी), बापू मेटकरी (पाटकळ), बिरुदेव पापरे (झगडेवाडी), गणेश डोंगरे आदींनी अर्ज दाखल केले आहेत.
३ एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार हे निश्चित होणार आहे.
गोडसे, भोसले, आवताडे यांच्या उमेदवारीमुळे रंगत
पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी व भाजपा या प्रमुख दोन पक्षात होणार असे मानले जात होते. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेकडून बंडखोरी करत शैला गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर स्वाभिमानीचे सचिन शिंदे यांना ए बी फॉर्मच मिळाल्याने स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे मानले जात आहे. भाजपने प्रशांत परिचारक यांना थांबविण्यात यश मिळविले असले तरी त्यांचे समर्थक असलेले पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाय समाधान आवताडे यांचे चुलत बंधू व बबनराव आवताडे यांचे पूत्र सिद्धेश्वर आवताडे यांनीही अर्ज दाखल केल्याने भाजपासमोर पेच निर्माण झाला आहे. शैला गोडसे यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी महाविकास आघाडी तर भोसले, आवताडे यांच्या अर्जांसाठी भाजपाकडून काय प्रयत्न केले जातात, याबाबत उत्सुकता आहे.