बार्शी : शहरातील राहते घर जुगार खेळण्यासाठी देऊन तीन पानी पत्त्याचा तिर्रट चालवलेल्या ठिकाणावर धाड टाकून पोलिसांनी ४६ हजार २०० रुपये जप्त केले. या कारवाईत १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
गुरुवारी रात्री रामेश्वर मंदिराजवळ एका घरावर पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संभाजी शिवाजी कदम (३१), किरण दहीहांडे (२५), कुणाल मधुकर नरळे (३७), रूपेश सदावर्ते (३८), शांतीलाल कदम (३६), संदेश डगे (३६), सोमनाथ बोचरे (३६), मनोज नांदेडकर (४५), आकाश नायकोजी (२५), धनाजी गरड (३०), सागर डुंम (३६), तर जुगार खेळण्यासाठी घर दिलेले राजू दहीहंडे (२३, सर्व रा. बार्शी) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्राच्या माहितीनुसार बार्शी- कुर्डूवाडी रोडवर रामेश्वर मंदिराजवळ राजू दहिहंडे याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर तिर्रट नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना मिळाली. फौजदार शामराव गव्हाणे, ज्ञानेश्वर केदार, कर्णेवाड, सहायक फौजदार अजित वरपे यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी रिंगण करून विनामास्क १२ जण जुगार खेळताना आढळले. अधिक तपास सहायक फौजदार अजित वरपे करत आहेत.