सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:29 AM2017-12-05T11:29:16+5:302017-12-05T11:31:49+5:30

कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे.

57 crore of loan waiver for Solapur district fell into the bank! | सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदारांच्या यादीत चुकाशासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवातचुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे. दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या याद्या शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या शेतकºयांच्या याद्या व रक्कम जिल्हा बँकेला येत आहे. सुरुवातीला याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले होते. शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या ३७ हजार ८३२ शेतकºयांच्या याद्या व सोबत  २०८ कोटी ७७ लाख १२ हजार ८९० रुपये जिल्हा बँकेला दिले  होते. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणाºया ५ हजार ९०७ शेतकºयांची यादी दिली होती, मात्र त्यांच्यासाठी आवश्यक ११ कोटी १४ लाख ८४ हजार १३४ रुपये इतकी प्रोत्साहनाची रक्कम मात्र दिलेली नाही.
बँकेने थकबाकीदार व पुनर्गठनाची आलेली ग्रीन यादी तपासणी केली असता ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावात, कर्ज रकमेत व अन्य चुका आढळल्या. या शेतकºयांची ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम बँकेकडे पडून आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून याद्यांमध्ये दुरुस्ती आल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेने आलेली रक्कम २९ हजार ६९१ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १५२ कोटी ६७ हजार ४४ रुपये जमा केले आहेत.
---------------------
यापुढे आवश्यकतेच्या ५० टक्के रक्कम देणार 
- सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव दिनेशकुमार जैन व सहकार खात्याचे सचिव एस.एस. संधू यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बँकांशी संवाद
- राष्टÑीयीकृत बँकांचे आलेले पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे काम मागे
- मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतरच पुढील रक्कम बँकांना देणार
- आता नव्याने यादीसोबत यादीतील शेतकºयांना आवश्यक असलेल्यापैकी               ५० टक्के रक्कम बँकांना         देणार.
- अगोदर दिलेल्या यादीतील अपात्र शेतकºयांची एकापेक्षा अनेक वेळा नावे असल्याने व अधिक रकमा आल्याने राज्यभरात बँकांकडे पैसे पडल्याने शासन करणार सुधारणा ़

Web Title: 57 crore of loan waiver for Solapur district fell into the bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.