६२ जणांच्या अहवालात ८ जण ‘कोरोना’ बाधित; सोलापुरातील रूग्णसंख्या पोहोचली ४७८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:09 PM2020-05-21T13:09:42+5:302020-05-21T13:11:00+5:30
१७५ जणांनी केली ‘कोरोना’वर मात; आतापर्यंत ३३ जणांचा झाला मृत्यू
सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे़ गुरूवारी सकाळच्या सत्रात मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरातील 'कोरोना' बाधितांची संख्या आता ४७८ पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास एकूण ६२ अहवाल प्राप्त झाले, यापैकी ५४ निगेटिव्ह तर ८ पॉझिटिव्ह आले आहेत. यात ८ पुरूष आणि ८ महिलांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत एकूण ४ हजार ८९३ जणांची स्वॅब चाचणी झाली. यात ४ हजार ४१५ निगेटिव्ह तर ४७८ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आतापर्यंत सोलापुरातील एकूण मृतांची संख्या ३३ असून यात २० पुरूष, १३ महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या आता १७५ इतकी झाली आहे़
--------------------
महसूल अधिकाºयाची कोरोनावर मात
डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्याप्रमाणे कोविड योद्धे म्हणून काम करणाºया प्रशासकीय अधिकाºयास कोरोना आजार झाला होता. महसूल अधिकाºयाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बुधवारी डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वी या प्रशासकीय अधिकाºयास कोरोना झाल्याचे समजले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता ते पूर्ण बरे झाले आहेत.