७०५ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:30 AM2020-12-30T04:30:17+5:302020-12-30T04:30:17+5:30
तालुक्यातील कुंभारी, बोरामणी, भंडारकवठे या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चुरस आहे. येथील निवडणुका बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा झडताहेत. ...
तालुक्यातील कुंभारी, बोरामणी, भंडारकवठे या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चुरस आहे. येथील निवडणुका बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा झडताहेत. कुंभारीची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग धूसर झाला असून, बोरामणी ग्रामपंचायतीसाठी पुन्हा-पुन्हा चर्चा केल्या जात आहे. भंडारकवठेमध्ये विशिष्ट वाॅर्ड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते.
--------
मंगळवारी दाखल झालेली अर्जाची संख्या
माळकवठे ११, कारकल १२, सादेपूर २७, लवंगी ३, बाळगी २, बरूर ५, हत्तरसंग २, टाकळी ४, नांदणी १, बोळकवठे १३, भंडारकवठे ३३, कुरघोट ९, वडकबाळ ११, तेलगाव (म) ७, अंत्रोळी ८, वडापूर १०, गुंजेगाव ११, येळेगाव ४, होटगी-सावतखेड २९, यत्नाळ ८, तीर्थ २, दिंडूर ४, लिंबिचिंचोळी ४, हत्तूर- चंद्रहाळ २५, मद्रे १७, शिंगडगाव १५, घोडातांडा ९, संगदरी ५, वडगाव-शिरपन्हाळली ७, मुस्ती ३, कर्देहळ्ळी ६, राजूर १, संजवाड ८, सिंदखेड ७, कुंभारी ३१, होटगीस्टेशन २३, फताटेवाडी ८, बोरामणी १६, कणबस १, इंगळगी ७, तांदूळवाडी २७, पिंजारवाडी १४, बक्षीहिप्परगे १९, वरलेगव १०, वडजी ४, मुळेगाव १३, मुळेगावंतांडा ६
------
चार ग्रामपंचायती निरंक
अकोले(म), हणमगाव, हिपळे, बोरूळ या चार ग्रामपंचायतीसाठी अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. बुधवारी अर्ज भरण्याची अखेरचा दिवस आहे.