तालुक्यात एकाच दिवसात ७३ पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:24 AM2021-04-28T04:24:13+5:302021-04-28T04:24:13+5:30
अक्कलकोट स्टेशन येथील एका रेल्वे ठेकेदाराचे काम करणारे १७७ कामगार होते. त्यापैकी सोमवारी दोघांना खोकला, सर्दीचा त्रास होऊ लागला. ...
अक्कलकोट स्टेशन येथील एका रेल्वे ठेकेदाराचे काम करणारे १७७ कामगार होते. त्यापैकी सोमवारी दोघांना खोकला, सर्दीचा त्रास होऊ लागला. यामुळे १३ जणांनी स्वतःहून अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घेतली. यात १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर स्टेशन आरोग्य विभागाकडून तपासणी शिबिर घेऊन पूर्णपणे म्हणजेच ४० जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तसेच अक्कलकोट शहर ३ तर ग्रामीण भागातील २० गावांतून २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, अशा तब्बल ७३ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरणात निर्माण झाले आहे.
तपासणी कामी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आश्विन करजखेडे, विस्तार अधिकारी महेश भोरे, इसाक काझी, सरोजा हंचनाळ, कलप्पा चौगुले, नीलेश जाधव, अमोल वंजारी, शिवाजी चंदनशिवे यांनी शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
-----
----
अक्कलकोट शहरात नवीन राजवाडा-१, आझाद गल्ली-१, म्हाडा कॉलनी-१, असे तीन तर ग्रामीण भागातील शावळ-१, समर्थनगर-१, सुलेरजवळगे-१, म्हैसलगी-१, किणी-१, बोरोटी ब्रु-१, सोळसे तांडा दुधनी-१, बुद्धनगर दुधनी-१, दुधनी शहर-१, दहिटणे-१, बासलेगाव-१, करजगी-१, घोळसगाव-१, शिरवळ-१, हंनुर-२, भुरीकवटे-१, अक्कलकोट स्टेशन-५२ असे तब्बल ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना अक्कलकोट येथील क्वारंटाइन सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.