सोलापुरातून बाहेर जाण्यासाठी ८७ हजार अर्ज; ४६ हजार लोकांनी सोलापूर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:19 PM2020-05-23T12:19:12+5:302020-05-23T12:21:25+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; परराज्यातील लोकांसाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था

87,000 applications to leave Solapur; 46,000 people left Solapur | सोलापुरातून बाहेर जाण्यासाठी ८७ हजार अर्ज; ४६ हजार लोकांनी सोलापूर सोडले

सोलापुरातून बाहेर जाण्यासाठी ८७ हजार अर्ज; ४६ हजार लोकांनी सोलापूर सोडले

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत विशेष आठ रेल्वेने १० हजार ४३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले २३ आणि २४ मे रोजी पंढरपूर येथून जोधपूर व सोलापुरातून हावडा येथे रेल्वेने पाठविण्यात येणारअद्याप शहरातील ३३९० तर जिल्ह्यातील ७६१२ अशा ११ हजार २ व्यक्ती गेलेल्या नाहीत

सोलापूर : सोलापुरातून बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ५७ हजार १७६ जणांनी तर परराज्यात जाण्यासाठी २९,९३२ जणांनी अर्ज केले एकूण अर्जांची संख्या ८७,०४८ इतकी आहे़ परराज्यातील नागरिकांना त्या त्या राज्यात पोहोच करण्यासाठी रेल्वे विभागाच्या मदतीने श्रमिक ट्रेन या नियोजित तारखेनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

लॉकडाऊनमुळे सोलापुरात परराज्यातील विस्थापित कामगार, धार्मिक यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती अडकल्या होत्या. १ मेपासून अशा व्यक्तींना आपल्या जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली. आपल्या मूळ जिल्हा किंवा राज्यात जाण्यासाठी अशा लोकांनी महापोलीस वेबसाईटवर अर्ज केले व त्यांना परवाने देण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. 

शहरातून पोलीस आयुक्तांकडे २२ हजार, जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे ३४ हजार ९०४ आणि निवारा केंद्रातील २७३ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बाहेरगावी जाण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज केलेल्या १८ हजार ६१०, जिल्ह्यातील २७ हजार २९१ आणि निवारा केंद्रातील २७३ असे ४६ हजार १७४ जण रवाना झाले आहेत. अद्याप शहरातील ३३९० तर जिल्ह्यातील ७६१२ अशा ११ हजार २ व्यक्ती गेलेल्या नाहीत. 

आणखी दोन रेल्वे जाणार
- आतापर्यंत विशेष आठ रेल्वेने १० हजार ४३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. अद्याप राजस्थान व पश्चिम बंगाल येथील २९२० स्थलांतरित अडकलेले असून, २३ आणि २४ मे रोजी पंढरपूर येथून जोधपूर व सोलापुरातून हावडा येथे रेल्वेने पाठविण्यात येणार आहे. 

Web Title: 87,000 applications to leave Solapur; 46,000 people left Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.