सोलापूर : पंढरीच्या वाटेवर हजारो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसले आहेत. टाळ मृदंगाचा गजर करीत चालत आहेत. तर भीमा नदीच्या पात्रात दारुच्या नशेमध्ये तर्रर असलेला तरुण आढळून आला. सोमवारी रात्री रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
विलास फपाट (वय- ४०, रा. पत्ता नाही) असे या तरुणाचं नाव आहे. भीमा नदीच्या काठी नशेमध्ये एक तरुण आढळल्याची खबर मिळताच पंढरपूर सरकार दवाखान्यातील रुग्णवाहिकेद्वारे त्या रुणाला दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन १०८ रुग्णवाहिकेद्वारे डॉ. अरविंद टिंगरे (माढा) यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्ण शुद्धीवर आहे. तो नेमका कोणत्या गावाचा आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी चालत निघालेल्या वृद्ध वारकऱ्यावर कुत्र्यानं हल्ला चढवल्यानं त्यांना जखमी व्हावं लागलं. सोमवारच्या मध्यरात्री बाराच्या नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ ही घटना घडली.