आषाढी यात्रा : चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी २० जीवरक्षक

By admin | Published: June 21, 2017 03:27 PM2017-06-21T15:27:07+5:302017-06-21T15:27:07+5:30

-

Aashadi Yatra: To prevent the accident in Chandrabhaga, 20 survivors | आषाढी यात्रा : चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी २० जीवरक्षक

आषाढी यात्रा : चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी २० जीवरक्षक

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २१ : सध्या सर्वत्र पाऊस पडत असून, चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे़ शिवाय आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे़ हे भाविक प्रथम चंद्रभागेत स्नान करूनच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात़ भाविक चंद्रभागेत स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीच्या वतीने २० जीवरक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली़
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर २४ ते ९ जुलै या कालावधीत भाविकांची संख्या सर्वाधिक असते़ हे भाविक चंद्रभागेत स्नानासाठी जात असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी व आपत्कालीन व्यवस्थेसाठी चंद्रभागा वाळवंट व नदीपात्रात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक साधनसामुग्रीसह नियुक्त केले आहे़ या पथकाकडे आॅक्सिजनसह असलेले एक वाहन, वॉकीटॉकी, एक बेस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, मोठ्या बॅटऱ्या चार, हँड बॅटऱ्या सहा, अग्निशमन गाड्या दोन, वायर रोप २०० मीटर, साधे रोप ३०० मीटर, लाईफ रिंग पाच, लाईफ जॅकेट पाच आदी सुविधा असतील़
या शिवाय शहरातील गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास मदतीसाठी सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती विलास महाजन यांनी दिली़

Web Title: Aashadi Yatra: To prevent the accident in Chandrabhaga, 20 survivors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.