चिखलठाण खूनप्रकरणातील आरोपीला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:21+5:302021-01-08T05:12:21+5:30
करमाळा : चिखलठाण येथील अजित गलांडे खूनप्रकरणी आरोपी उमेश गलांडे याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यात ...
करमाळा : चिखलठाण येथील अजित गलांडे खूनप्रकरणी आरोपी उमेश गलांडे याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यात चिखलठाण येथे ११ जुलै २०२० रोजी अजित नवनाथ गलांडे याचा खून झाला. या खूनप्रकरणात त्याचे वडील नवनाथ गलांडे यांनी उमेश राजाराम गलांडे, राजाराम बलभीम गलांडे, संतोष राजाराम गलांडे व इतर दोघांविरुद्ध यांच्यावर करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. मिथुन गलांडे व मयत अजित गलांडे हे दोघे ११ जुलै रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास चिखलठाण येथे मासेमारी करत होते. त्यांच्यात व उमेश गलांडे यांच्यात मासेमारी करण्याच्या जागेवरून भांडण झाले. उमेश गलांडे व इतरांनी डोक्यात व छातीवर काठीने मारून खून केला. या घटनेनंतर उमेश गलांडे, संतोष गलांडे, राजाराम गलांडे यांना अटक करण्यात आली. उमेश गलांडे यांनी ॲड. निखिल पाटील यांच्यामार्फत जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे धाव घेतली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी आरोपी उमेश गलांडे यांची ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्या जामिनावर मुक्तता केली. याप्रकरणात आरोपीतर्फे ॲड. निखिल पाटील, ॲड विक्रम सातव, ॲड. दत्तप्रसाद मंजरतकर, तर मूळ फिर्यादीतर्फे धनंजय माने यांनी, तर सरकारतर्फे ॲड. डी. डी. देशमुख यांनी काम पाहिले.