काम रखडल्याने कार्यकर्ते चिडले, तिरडी मोर्चा काढून नगरपरिषदेला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:38+5:302021-07-29T04:23:38+5:30

हा मोर्चा भगवा झेंडा चौक येथून गांधी चौकमार्गे नगरपरिषद कार्यालयावर धडकला. मोर्चात जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे, लोकसभा अध्यक्ष माळाप्पा ...

Activists got angry due to delay in work and marched on the Municipal Council | काम रखडल्याने कार्यकर्ते चिडले, तिरडी मोर्चा काढून नगरपरिषदेला भिडले

काम रखडल्याने कार्यकर्ते चिडले, तिरडी मोर्चा काढून नगरपरिषदेला भिडले

Next

हा मोर्चा भगवा झेंडा चौक येथून गांधी चौकमार्गे नगरपरिषद कार्यालयावर धडकला. मोर्चात जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे, लोकसभा अध्यक्ष माळाप्पा खांडेकर, धनाजी कोकरे, अभिजीत सोलनकर, वैभवी भिसे, गोरख वाकडे, सोमनाथ देवकाते, सागर होनमाने, बाळासाहेब नगरे, विनायक गायकवाड, प्रियांका वाघमोडे, बजरंग सलगर, श्यामल माने, अमित होनमाने, अर्जुन शिंदे, सूरज गायकवाड, भागवत तांबवे, मल्हारी खरात, बंटी हनवते, कैलास खिलारे, किरण अस्वरे, सुग्रीव सलगर, विठ्ठल सोनवणे, लक्ष्मण सरवदे, शंकर खरात, दादासाहेब वाघमोडे, सागर अस्वरे, प्रेम कांबळे, रोहित अडसूळ, सागर अस्वरे, सद्दाम पटेल, भाऊ गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.

----

यासाठी काढला मोर्चा

शहरात भुयारी गटारीच्या कामामुळे चिखल होत असल्याने नागरिकांचे हात व पाय मोडले. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कुर्डूवाडी नगरपरिषदेवर चिखलफेक मोर्चा काढला होता. यावेळी नगरपरिषदेने २८ जुलै रोजी मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक लावू, असे लेखी आश्‍वासन दिले होते. परंतु मोर्चेकऱ्यांना २६ जुलै रोजी २८ तारखेला होणारी बैठक अपरिहार्य कारणास्तव रद्द केल्याचे लेखी पत्र देण्यात आले. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने तिरडी मोर्चा काढला.

-----फोटो ओळ-

कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या कार्यालयावर रासपाच्या वतीने काढलेल्या मोर्चात तिरडी कार्यालयात नेण्यावरून पोलीस आणि मोर्चेकऱ्यांत झटापट झाली. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी आणलेली तिरडी जप्त करताना पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व पोलीस.

Web Title: Activists got angry due to delay in work and marched on the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.