सोलापूरात जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या आंदोलनआॅनलाईन लोकमत : सोलापूरसोलापूर दि़ १६ - जिल्हयात जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामुळे दररोज ५ कोटींचे व्यवहार ठप्प होत आहेत. राज्यातील आंदोलनामुळे दररोज २०० कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात आज लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. काल पासून हे आंदोलन सुरू असून समान न्याय व समान संधी या तत्वाने विविध १० मागण्या कर्मचारी संघटनेच्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालय व नागपूर खंडपीठाने दिलेल्या निदेर्शानुसार मार्च २०१५ मध्ये पदोन्नती चा कोटा वाढविणे तसेच वित्त व लेखा सेवा वर्ग ३ ची परीक्षा दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावी. याबाबत सर्वोच्च न्यायालय व नागपूर खंडपीठाने दिलेल्या निदेर्शानुसार ग्रेड पे देणेचे आदेश दिला आहे. इंदिरा आवास योजना व रोजगार हमी योजनांसाठी सहाय्यक लेखाधिकारी यांचे पद निर्माण करणेत यावे. लेखाधिकारी वर्ग २ चा पदोन्नतीचा कोटा जिल्हा परिषद कर्मचारी यांचेसाठी वाढवून देणेत यावा.सहाय्यक लेखाधिकारी यांना राजपत्रित अधिकारी यांना वर्ग २ चा दर्जा देणेत यावा, वरिष्ठ सहाय्यक व सहाय्यक लेखाधिकारी यांचे ग्रेड पे वाढविणेत यावा. या मागणेयासाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांचे समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचा जिल्ह्यातील विकास कामांना फटका बसला आहे. जिल्हातील दररोज ५ कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
सोलापूरात जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या आंदोलन
By admin | Published: March 16, 2017 6:26 PM