संभाजी महाराज मालिकेतील बहिर्जी नाईकांची भूमिका बजावणारे व कारभारी लय भारी या मालिकेत सध्या जोरदार चर्चेत असलेले अंकुश पाटील यांची भूमिका पार पाडणारे अभिनेते अजय तपकीरे यांनी अकलूजचे नाव देश व राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविले असल्याने त्यांना बहुजन ब्रिगेडच्यावतीने संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह देऊन अकलूज भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे, पश्चिम महाराष्ट्र सदस्य ऋषीपाल बनसोडे, जिल्हा सचिव माऊली धाईंजे, माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके, सांगोला तालुका अध्यक्ष कुमार कांबळे, अनिल साठे, उदय कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथील डॉ. शितल शहा यांना जीवनदाता, अकलूजमधील डॉ. एम. के. इनामदार यांना जीवनगौरव, मुबारक कोरबू यांना यशस्वी उद्योजक, पुणे येथील संतोष हरपळे यांना कोरोना योद्धा, आण्णा देवकर यांना आदर्श गौरक्षक, चौफुला येथील हॉटेल जगदंबाचे मालक गडधे यांना अन्नदाता, माळीगर येथील अशोक तडवळकर यांना समाजरत्न, डॉ. यशवंत कुलकर्णी यांना आदर्श मॅनेजिंग डायरेक्टर हे पुरस्कार बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी प्रदान केले.