यावेळी नगरपालिकेतील कारभाराची चौकशी करून संबंधितांवर अधिकारी व पदाधिकऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी येथील उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांकडून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले. यादरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी निवासी राहत नसल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी यांनी या उपोषण स्थळावरून नगरपालिकेत जाऊन सर्वपक्षीयांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयीन अधीक्षकाकडे टॉवेल, बनियन, टूथपेस्टसह पूर्ण आहेर देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.
या लाक्षणिक उपोषणामध्ये आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी, शिवसेना शहराध्यक्ष समाधान दास, रिपाइंचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, प्रा. डॉ. आशिष रजपूत, युवा सेना तालुका समन्वयक अतुल फरतडे, मुस्लीम अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम मुलाणी, आरपीआय युवा आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, शाबीर चाऊस, इर्शाद कुरेशी,सागर होनमाने, कृष्णा अस्वरे, रासपचे शहराध्यक्ष अभिजित सोलंकर, धनाजी कोकरे, सोमनाथ देवकते, दर्शन काशीद, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे भाऊसाहेब कांबळे, रोहन शिंदे,श्रीकांत डांगे, दिनेश शिंदे, संजय सरवदे, अतुल राजगे उपस्थित होते.
----
प्रस्तावासोबत चुकीची प्रमाणपत्रे
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी, नगरअभियंता तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक यांनी संगनमताने चुकीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत व अभियंता यांनी वरिष्ठ कार्यालयात या प्रस्तावासोबत सादर केलेली प्रमाणपत्रे चुकीची असून, याची तातडीने चौकशी व्हावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाचे दिवस असल्याने उपोषणस्थळी उपोषकर्त्यांनी उभारलेल्या मंडपाला प्लॅस्टिकचे आवरण लावण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभरात झालेल्या रिमझिम पावसाचा उपोषकर्त्यांना त्रास झाला नाही.
---
१७कुर्डूवाडी-उपोषण
कुर्डुवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात सर्वपक्षीय उपोषण करताना नेते व कार्यकर्ते.
---