सोलापूर : उजनी धरण आणि नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , भंडारकवठे ,सादेपूर, औज (म) आणि चिंचपूर यासह अन्य दोन असे सातही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्यात बुडाले आहेत या पूर स्थितीमुळे कर्नाटकाकडे जाणारी अनेक वाहने नदीकाठीच खोळंबल्याचे चित्र दिसून येते.
आज सकाळपासून भीमा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे़ सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान वडापूर बंधारा पाण्याखाली गेला त्यामुळे वडापूरहुन सिद्धापूर मंगळवेढाकडे जाणारी वाहने जागेवरच थांबली भंडारकवठे च्या बंधा?्यावर पाणी आल्याने शेतक?्यांची ये जा थांबली. सादेपुर , औज (म) आणि चिंचपूर बंधा?्यावर दुपारी पाणी वाढल्याने कर्नाटककडे जाणारी वाहतूक खोळंबली .रात्री उशिरापर्यंत बंधा?्याजवळ नागरिक पाणीपातळी कमी होण्याची वाट पहात थांबले होते.
दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार रमा जोशी यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या तेथील संभाव्य पूर स्थितीचा आढावा घेतला ग्रामस्थांना रात्री सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पाण्याचा विसर्ग वाढला तर तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले
नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशाराभीमा नदीकाठी असलेली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , कुसुर , खानापूर, तेलगाव , भंडारकवठे, लवंगी ,चिंचपूर, बाळगी ,टाकळी, हत्तरसंग ,कुडल, कारकल, कुरघोट ,बोळकवठे , औज (म) या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . या गावात प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे . टाकळी , सादेपुर येथे पोलीस तर वडापूर येथे जलसंपदा विभागाचे कर्मचारी तैनात आहेत .अन्यत्र महसुलचे मंडल अधिकारी , तलाठी ,कोतवाल यांची दक्षता पथकं सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली .विसर्ग वाढला तर वस्त्यांना धोकासद्यस्थितीत पूरस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र रात्री भीमा नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यास कुसुर , खानापूर, तेलगाव आणि लवंगी या नदीलगत असलेल्या गावांना धोका संभवतो. नदीकाठच्या शेतातील वस्त्यांत राहणारे शेतकरी , ग्रामस्थांना अन्यत्र हलवावे लागणार आहे .अशा वस्त्यांची प्रशासनाने पाहणी केली आहे .त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .तशी स्थिती उद्भवली तर त्यांच्या गावातील जुन्या घरात , नातळगांकडे , शाळांमध्ये हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे .आपत्ती व्यवस्थापन सज्जपूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी केली आहे . तहसीलकडे एक इंजिन बोट , पाच लाईफ जॅकेट आणि आठ लाईफ रिंग उपलब्ध आहेत . गरजेनुसार नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले .