सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी अखेर महेश कोठे समर्थक अमोल शिंदे विराजमान झाले. याबाबतच्या निवडीचे पत्र शिवसेनेच्यावतीने सोमवारी महानगरपालिकेस देण्यात आल्यानंतर माळवते विरोधीपक्ष नेते महेश कोठे यांच्याकडून पदभार घेताच शिंदे समर्थकांनी पालिकेत दिवाळी साजरी केली. गुलालाची मुक्त उधळण करत फटाके फोडण्यात आले. विरोधी पक्षनेता यांच्या दालनात झोलेल्या या सोहळ्यात नुतन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शह पाणी पुरवठा, रस्ते शहरातील मुलभुत सुविधा सोडवण्यासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन शहर वासियांना दिले.
पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अमोल शिंदे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना दिले होते. सोमवारी शिंदे यांच्या निवडीचे पत्र सत्ताधारी आणि पालिका प्रशासनास प्राप्त झाले. सोमवारी अमोल शिंदे यांनी पालिकेत येवून विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार घेतला. माळवते विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याकडून अमोल शिंदे यांनी पदभार घेतला. मंगळवेढा तालमीचा युवा कार्यकर्ता पालिकेचा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर पालिकेच्या आवारात शिंदे समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. यावेळी पुरूषोत्तम बरडे, प्रकाश वाले, चेतन नरोटे,गणेश वानकर,संतोष पवार,दिलीप कोल्हे आदींची य भाषणे झाली. सर्वांनी शिंदे यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमोल शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम , मावळेत विरोधी पक्षनेते महेश कोठे ,शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे, कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रकाश वाले , राष्ट्रवादीेचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव,तौफिक शेख, नगरसेवक देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, गणेश वानकर, विनोद भोसले, उमेश गायकवाड , संतोष भोसले सारिका पिसे, कुंमूद अंकाराम, स्मार्ट सिटीचे त्र्यंबक ढेगळे पाटील, उपायुक्त धनराज पांडे, संकेत पिसे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.