माढा : दुष्काळाची तीव्रता गंभीर असून, ३१ आॅगस्टच्या अगोदर छावण्या बंद होणार नाहीत, याची काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा दिला आहे.
माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी येथील शेतकºयांना वरील दिलासा दिला़ प्रारंभी वडशिंगे येथील शालेय विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत, खा़ ओमराजे निंबाळकर, सचिन आहिर, जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत, झेडपी सदस्य धनंजय सावंत, युवा नेते पृथ्वीराज सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, नगरसेवक मनोज शेजवाल, जिल्हा अध्यक्ष संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख चरणराज चवरे, तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, युवासेनेचे वैभव मोरे, मुन्ना साठे, शंभू साठे, राजेंद्र्र वाल्मिकी, समाधान दास उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, या यात्रेतून मी मत मागायला आलो नसून जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्या स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, हे जाणून घ्यायला आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माढ्यातील शालेय विद्यार्थी शिवराज गायकवाड यांनी दप्तराच्या ओझ्याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी लवकरच यावर तोडगा काढण्यासंदर्भात प्रयत्न असणार असल्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले़
कर्जमाफी नकोय़़क़र्जमुक्ती हवी आहे- कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी शेतकºयांना कर्जमाफी नकोय, कर्जमुक्ती हवी असल्याचे म्हणाले़ निवडणुका आल्यावर अनेक पक्ष येतात, वाकून नमस्कार करतात, मते मागतात़ मात्र पाच वर्षे शिवसेना जनतेसोबत कायम राहत असते. कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले मात्र कर्जमाफी न झालेल्या शेतकºयांनी पदाधिकाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले. सुजलाम् सुफलाम्, दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सत्तेत असो किंवा नसो़़़ दिलेले वचन शिवसेना पूर्ण करत असून, देश व संपूर्ण महाराष्ट्र भगवा झाला आहे़ यापुढील काळातही भगवा करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.