मतमोजणीसाठी २१९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:19+5:302021-01-18T04:20:19+5:30
तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीसाठी ८४.८७ टक्के मतदान झाले आहे. ८९ हजार ७५६ पुरुष मतदार तर ७६ हजार ९५६ स्त्री मतदार ...
तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीसाठी ८४.८७ टक्के मतदान झाले आहे. ८९ हजार ७५६ पुरुष मतदार तर ७६ हजार ९५६ स्त्री मतदार असे एकूण १ लाख ६६ हजार ७१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणीसाठी ८ टेबलवर ९ फेऱ्यात गावनिहाय मतमोजणी केली जाणार आहे.
मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाहणीत होणार आहे. मतमोजणीसाठी संबधित अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये मतमोजणी मशीन कसे सुरु करावे, सील कसे उघडावे, मतदान नोंदी कशा घ्याव्यात, याबाबत प्रशिक्षण दिले आहे.
मतमोजणीवेळी शासकीय धान्य गोदाम (पंढरपूर) येथे नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निहाय निकाल ध्वनीक्षेपकावरुन जाहीर करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी असेल अशाच प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विवेक साळुखे यांनी यावेळी सांगितले.
कासेगांव, करकंब ग्रामपंचायतीची शेवटी होणार मतमोजणी
ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणीच्या प्रत्येक फेरीस ३० ते ४० मिनिट लागणाची शक्यता आहे. कासेगांव आणि करकंब ग्रामपंचायत मोठी असल्याने मतमोजणी सर्वात शेवटी करण्यात येणार आहे.
असा आहे पोलीस बंदोबस्त
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला आहे. यामध्ये ४ पोलीस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलीस निरीक्षक/ उप पोलीस निरीक्षक सपोनि, १९३ पोलीस अंमलदार, १ दंगा काबू पथक (३५ कर्मचारी), १ एसआरपीएफचे पथक (८ कर्मचारी), स्ट्रिकिंगचे १ पथक (१६ कर्मचारी) आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.