पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी
बऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. अशा स्थितीत बहुतांश जनावरांना लम्पी या आजाराची लागण होत आहे. बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांची जनावरे लाळ ,खुरकत, लम्पी रोगाने आजारी पडत आहेत. गावात असलेला पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करून चालू ठेवण्याची मागणी पशु पालकांमधून होत आहे.
मातनहळ्ळी-बालाजी तांडा रस्ता करा
उडगी: अक्कलकोट तालुक्यातील मातनहळ्ळी-बालाजीतांडा या दोन किलो मीटर रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता २० वर्षांपूर्वी झाला होता. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनसुद्धा याची दखल घेतली जात नाही. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नव्याने रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
हिळ्ळी- शावळ रस्त्याची दुरवस्था
उडगी: अक्कलकोट तालुक्यात हिळ्ळी- शावळ रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच धुळीची समस्या निर्माण झाली आहे. झाडीझुडपी वाढली आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन नवीन रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.