सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:36 AM2017-12-05T11:36:27+5:302017-12-05T11:38:29+5:30

कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.

Banks have handled the loan for Solapur district, only 108 crore rupees are available for the Rabbi | सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

googlenewsNext
ठळक मुद्देदोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीचजिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.
सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रब्बी हंगामात बँकांकडून कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याच कालावधीत मागील वर्षीचे कर्ज भरणे व नव्याने कर्ज घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बीसाठी कर्ज वाटपाला आॅक्टोबरपासून सुरुवात होते. आॅक्टोबरपासून नव्याने कर्ज वाटपाला सुरुवात होत असली तरी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले जाते. यावर्षी कर्जमाफीमुळे कर्ज घेणारे भरण्यासाठी बँकांकडे फिरकत नाहीत व नव्याने कर्जवाटपही केले जात नाही. 
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत १०१ शेतकºयांना ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटले आहे. ग्रामीण बँकेला ९४ कोटी ३२ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, बँकेने आतापर्यंत २०२ शेतकºयांना दोन कोटी ४५ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच राष्टÑीयीकृत बँकांना रब्बी हंगामासाठी १८१५ कोटी १६                 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ५१६१ शेतकºयांना १०४ कोटी  ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.
---------------------
बँकांकडून पारखून कर्ज वाटप 
- २००७-०८ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कर्जमाफीनंतर राज्य शासनाने यावर्षी कर्जमाफी केली आहे. काही ठराविक शेतकरी वगळता बहुतेक शेतकरी दोन्ही वेळच्या कर्जमाफीच्या यादीत आहेत. कर्ज घेतल्यानंतर पुन्हा कर्जमाफीची वाट पाहणारे व बँकांशी नियमित व्यवहार करणारे शेतकरी अशा दोन प्रकारच्या शेतकºयांची यादी बँकांकडे आहे. थकबाकीमुळे बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत आल्याने आता बँका पारखून कर्ज देत आहेत.
------------------
- दोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीच
- सर्व बँकांना रब्बीसाठी २३८९ कोटी ४८ लाख रुपये इतके कर्ज वाटप करावयाचे असून, प्रत्यक्षात १०८ कोटी एक लाख रुपयेच कर्ज वाटले आहे.
- मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले होते.
- जिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.

Web Title: Banks have handled the loan for Solapur district, only 108 crore rupees are available for the Rabbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.