बार्शी तालुक्यात १७ हजार लोकांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:45+5:302021-04-01T04:22:45+5:30

बार्शी तालुक्यातील १७ केंद्रावर लस दिली जात आहे. यामध्ये शहरातील नऊ आणि ग्रामीण भागातील आठ केंद्राचा समावेश आहे. या ...

In Barshi taluka, 17,000 people took the first dose of Corona | बार्शी तालुक्यात १७ हजार लोकांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

बार्शी तालुक्यात १७ हजार लोकांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

Next

बार्शी तालुक्यातील १७ केंद्रावर लस दिली जात आहे. यामध्ये शहरातील नऊ आणि ग्रामीण भागातील आठ केंद्राचा समावेश आहे. या लसीकरणामध्ये २ हजार २५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर २ हजार ७१९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंट वर्कर कर्मचाऱ्यांपैकी १४१२ जणांनी पहिला तर १९६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. साठ वर्षावरील नागरिकात ११ हजार ३३६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांचा पहिला डोसचा कालावधी आता संपत आल्याने दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अशा दोघांनी डोस घेतला आहे. दीर्घ आजार असलेल्या ४५ वर्षावरील १ हजार ९७९ जणांनी लस घेतली आहे. तर दोघांनी दुसरा डोस घेतला आहे. डोस घेतलेल्यामध्ये ३७२ शिक्षकांचाही समावेश आहे.

१ एप्रिल पासून ४५ वर्षा पुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले आहे. आजपर्यंत आ. राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी या पदाधिकाऱ्यांनीही लस घेऊन नागिरकांना लस घेण्यासाठी आवाहन केले आहे.

या १६ ठिकाणी लसीकरणाची सोय

चौधरी हॉस्पिटल बार्शी, प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगाव, वैराग, तडवळे, गौडगाव, पानगाव,उपळे दुमाला, चिखर्डे, ग्रामीण रुग्णालय पांगरी, बार्शी, NUHM बार्शी, श्रुश्रूत हॉस्पिटल बार्शी, सुविधा हॉस्पिटल बार्शी, भातलवंडे हॉस्पिटल बार्शी, जगदाळेमामा हॉस्पिटल बार्शी, कॅन्सर हॉस्पिटल बार्शी अशा १६ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे.

----

Web Title: In Barshi taluka, 17,000 people took the first dose of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.