मोडनिंब येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण शिबिराचा समारोप राजवाडा सभागृहात पार पडला. पाच दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये महिला सबलीकरण करणे, गट उद्योगविषयी मार्गदर्शन करणे, गावपातळीवर महिलांचे संघटन बांधणी करून महिलांची स्वतंत्र संघटना तयार करणे तसेच ग्रामसंघ तयार करून गावपातळीवर तीन पदाधिकाऱ्यांची निवड करणे, यामध्ये अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, लिपिक अशी निवड करणे या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून वर्धा येथील वरिष्ठवर्धिनी पल्लवी अतुल कुत्तरमारे, संध्या नारायण उघडे, वर्षा श्रीकृष्ण चव्हाण यांनी प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपास जि.प. सदस्य भारत शिंदे, सरपंच मीना शिंदे, नागनाथ ओहोळ, अनिल शिंदे, ज्योत्स्ना गाडे, कल्याणी तोडकरी, शीतल मस्के, प्रमिला खडके, प्रणिती गाडे, सलोनी जगळे व अरुण सुर्वे उपस्थित होते.
पाच दिवस प्रशिक्षण शिबिरासाठी १९ बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्य मिळून १३० महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता निचाळ, प्रस्तावना पल्लवी कुत्तरमारे उज्ज्वला ओहोळ यांनी आभार मानले.
--------