करमाळा : शहरात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून करमाळा नगरपरिषद सर्वोतोपरीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. शहरातील नागरिकांच्या गर्दीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी मुख्य चौकांना जोडणाºया गल्ली बोळांना नगरपरिषदेकडून बॅरेकेटींग करून रहदारीवर वचक बसवला आहे.
संचारबंदी दरम्यान स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना - धोका घराबाहेर पडू नका, कोरोना- कोई रोड पर ना निकले असे प्रबोधन संदेश शहरातील मुख्य रस्त्यांवर नगरपरिषदेकडून रेखाटले आहेत. नागरिकांनी कोरोना आपत्ती जन्य परिस्थितीत घरी बसावे बाहेर पडू नये यासाठी सतत नगरपरिषदेकडून प्रबोधन व गोड शब्दात सांगूनही काही नागरिक किराणा आणण्याचे, बँकेत जाण्याचे, दवाखान्यात जाण्याचे अशी खोटी कारणे देवून शहरात इतरत्र फिरताना दिसतात अशा नागरिकांवर कठोर कारवाईचा पवित्रा मुख्याधिकारी वीणा पवार यांनी घेतला आहे.
गस्त पथकाकडून अशा विनाकारण बाहेर फिरणाºया नागरिकांच्या गळ्यात विशिष्ट मी निर्लज्ज आहे, कारण मी अनावश्यक घराबाहेर पडतो. मी सुरक्षित अंतर ठेवत नाही. मी गर्दी करून उभा राहतो मला कोरोनाची भीती वाटत नाही - एका निर्लज्ज नागरिक अशी पाटी घालण्यात येत आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी जे नागरिक सहकार्य करत नाही त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर पावले उचलले जात आहेत.