सोलापुरातील दोन खासदार, सात आमदार, महापौरांसह ४६ लोकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 01:05 PM2021-07-06T13:05:26+5:302021-07-06T13:05:32+5:30
आक्रोश मोर्चात संचारबंदीचे उल्लंघन : फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद
सोलापूर : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेले दोन खासदार, सात आमदार, महापौर व संयोजक नरेंद्र पाटील यांच्यासह ४६ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्चादरम्यान संचार बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
शहरात कोराेनाचा व डेल्टा प्लस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालय व महानगरपालिकेच्या वतीने संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आक्रोश मोर्चाच्या संयोजकांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते जमवून गर्दी करण्यात आली होती. त्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत घेऊन जाण्यात आला. राजकीय नेत्यांसह हजारो लोक या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. १.१५ वाजता निघालेला मोर्चा दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित करण्यात आला. दरम्यान, बेकायदेशीर गर्दी करून पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोर्चातील लोकांनी घोषणाबाजी केली व फिजिकल डिस्टन्स न ठेवता कोरोना नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी फौजदार सोमनाथ देशमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले करीत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
- किरण पवार (रा. जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ), राम जाधव (रा. राघवेंद्र नगर, मुरारजी पेठ), खासदार डॉ. जयसिद्धेस्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संयोजक नरेंद्र पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, अमर पुदाले, विनायक विटकर, धैर्यशील मोहिते-पाटील, शहाजी पवार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अनंत जाधव, विक्रम देशमुख, सतीश ऊर्फ बिज्जू प्रधाने, राजू सुपाते श्रीकांत देशमुख, नगरसेवक संतोष भोसले, सोमनाथ राऊत, प्रसाद लोंढे, निखिल भोसले, विजयकुमार डोंगरे, मोहन डोंगरे, ललित धावणे, मतीन बागवान, प्रताप पाटील, मनोज शिंदे, विजयकुमार साठे, राजकुमार पाटील, सौदागर शिरसागर, विष्णू बरगंडे, सुरेश अंबुरे, अमीर मुलाणी, पांडुरंग गायकवाड, मकरंद माने, अक्षय सूर्यवंशी, अक्षय अंजीखाणे, सागर आतनुरे व अन्य लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.