मोठी बातमी; स्वसंरक्षणासाठी सोलापुरातील  पाच आमदार बाळगतात रीतसर रिव्हॉल्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 03:54 PM2022-01-11T15:54:23+5:302022-01-11T15:54:30+5:30

मानेंकडे केवळ परवाना : प्रणिती शिंदे, दोन देशमुखांसह पाच जणांकडे नाही शस्त्र परवाना

Big news; Five MLAs from Solapur carry revolvers for self-defense | मोठी बातमी; स्वसंरक्षणासाठी सोलापुरातील  पाच आमदार बाळगतात रीतसर रिव्हॉल्वर

मोठी बातमी; स्वसंरक्षणासाठी सोलापुरातील  पाच आमदार बाळगतात रीतसर रिव्हॉल्वर

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सहा आमदारांकडे शस्त्र परवाना आहे. ज्यांच्याकडे परवाना आहेत, ते आमदार पिस्टल किंवा रिवॉल्वर बाळगतात. तर पाच आमदारांकडे शस्त्र परवाना नाही.

शेतीच्या वादातून शत्रुत्व वाढल्यामुळे किंवा सुरक्षेच्या कारणास्तव अनेक जण जिल्हा प्रशासनाकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज करतात. सुरक्षेच्या दृष्टीने बहुतांश आमदार शस्त्र बाळगत असल्याची माहिती आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे दोन शस्त्र परवाना आहेत. तर त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेदेखील शस्त्र परवाना आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडेदेखील शस्त्र परवाना आहे. मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, परंतु ते शस्त्र बाळगत नाहीत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडेदेखील शस्त्राचा परवाना आहे. पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्याकडेदेखील शस्त्राचा परवाना आहे.

..........

यांच्याकडे नाही परवाना

माळशिरसचे आमदार राम सातपुते तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्याकडे शस्त्राचा परवाना नाही. यासोबत शहरातील आमदार प्रणिती शिंदे, विजयकुमार देशमुख तसेच सुभाष देशमुख यांच्याकडे देखील शस्त्राचा परवाना नाही.

.................

शस्त्र वापरण्याची कारणे

  • जीवाला धोका असल्यामुळे
  • शत्रूकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे
  • रानावनात रानटी जनावरांकडून धोका असल्यामुळे
  • सिक्युरिटी व्यवसायाकरिता

 

सुरक्षेसाठी मी शस्त्र बाळगतो. शस्त्राचा परवाना प्रशासनाकडून मिळविला आहे. निवडणुकीच्या काळात शस्त्र प्रशासनाकडे जमा करतो.

- आमदार बबनदादा शिंदे, माढा तालुका

.........

Web Title: Big news; Five MLAs from Solapur carry revolvers for self-defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.