माढा : माढा पोलीस स्टेशनच्या सबजेलमधून टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांच्या गुन्ह्यातील दोन व कुर्डूवाडी पोलीस स्टेशन यांच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अशा एकूणच चार आरोपींनी पळ काढला आहे.
सिध्देश्वर शिवाजी केचे, (बनावट चलनी नोटा) (टेभुर्णी पोलीस स्टेशन), अकबर सिद्दाप्पा पवार (बेकायदेशीर पणे हत्यार बाळगणे) ( कुर्डूवाडी पोलीस स्टेशन), आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर (302) ( टेंभुर्णी पोलीस स्टेशन), तानाजी नागनाथ लोकरे (पास्को) ( कुर्डूवाडी पोलीस स्टेशन) असे पळ काढलेल्या चार जणांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हे चार आरोपी माढा सबजेलमधून सोमवार दि १९ रोजी सकाळी अकबर पवार यास झटका आल्याचा बनाव केला. व यावेळी दरवाजा उघडल्यावर वरील सर्व आरोपीने केलेल्या झटापटीत नंतर सबजेलमधून पळ काढला असून याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार यांनी सकाळी चार आरोपी धक्का मारून पळून गेले असे कळवल्यानंतर माढा पोलिसांनी शहरातील ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. याबाबत माढा पोलिसात नोंद झाले असून परिसरातील वैराग, कुर्डूवाडी, टेंभुर्णी तालुका पोलिस स्टेशनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.