मोठी बातमी; उद्यापासून सोलापूर शहरात सकाळी ७ ते १ वाजेपर्यंतच किराणा दुकान, भाजीपाला, दूध चालू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:22 PM2021-04-16T19:22:59+5:302021-04-16T19:24:24+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने सकाळी 7:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत चालू राहतील प्रत्येक दुकानदारांनी कोविड 19 चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहील.
शहरातील दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट अथवा rt-pcr किंवा स्वतःचे लसीकरण केलेबाबातची माहिती आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असेल. तसेच दूध संकलनासाठी डेयारी सायंकाळी 6:00 ते 7:00 या वेळेत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांच्या मालकांनी ग्राहकांना उभे राहण्याकरिता किमान एक मीटर अंतरावर गोल रिंगण आखणे आवश्यक राहील व भारत सरकारच्या दिलेल्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरणं करून घ्यावे सर्व दुकानदारांनी कोविड19 बाबत सुरक्षेचे सर्व उपाय जसे की पारदर्शकता काचेतून ग्राहकांशी संवाद साधने किंवा फेशिल्ड, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादीचे काटेकोर पणे वापर करावे तसे न केल्यास महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.