सोलापूर : जुगाराच्या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी न पडण्यासाठी दोन लाखाची लाचेची मागणी करून ती स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी व एका खासगी व्यक्तीला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
गणपतसिंग मोहनसिंग चव्हाण (वय 38 वर्षे, पद -पोना/373 नेमणूक. सदर बझार पोलीस स्टेशन अंकित - सदर बझार,पोलीस चौकी, सोलापूर शहर) व धीरजकुमार पांडुरंग शिवशरण (वय -34 वर्षे) असे लाच स्वीकारलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत हकीकत अशी की, यातील तक्रारदार यांचे मित्रावर जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी आरोपी क्रमांक १ चव्हाण यांनी 2,00,000/- रुपये लाच मागणी करून, खाजगी इसम आरोपी क्रमांक 2 धीरजकुमार शिवशरण याचे मार्फत 2,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारताना असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस उपनिरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस निरीक्षक रशीद बाणेवाले, श्रीराम घुगे सनी वाघमारे यांनी केली आहे.