एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महापौर, सभागृहनेत्यांसह भाजपाच्या नगरसेवकांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 02:52 PM2021-11-01T14:52:26+5:302021-11-01T14:52:34+5:30

सोलापूर - संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे ८/१६/२४ ...

BJP corporators along with the mayor and assembly leaders paid a visit to the ST workers' agitation | एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महापौर, सभागृहनेत्यांसह भाजपाच्या नगरसेवकांनी दिली भेट

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महापौर, सभागृहनेत्यांसह भाजपाच्या नगरसेवकांनी दिली भेट

Next

सोलापूर - संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे ८/१६/२४ टक्के तसेच सण, उच्चल १२५००/- रुपये मिळावा, राज्य सकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीचा दर तीन टक्के प्रमाणे मिळावा, घरभाडे भत्ता मिळावा, दिवाळी भेट म्हणून रु.१५०००/- सानुग्रह अनुदान मिळावा अशा विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांच्यावतीने व माजी पालकमंत्री विजयकूमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर पाठींबा देत आंदोलना नगरसेवकांनी बसत कर्मचाऱ्यांच्या व्यथा एकूण घेतल्या.

सोमवारी पाठिंब्याचे पत्र महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी व नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिकांना परगावी प्रवास करण्याकरिता जी प्रवास सेवा दिली जाते, त्यामध्ये मोठया प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. आज आपले हे एस.टी.कामगार यांनी जर सेवा देणे बंद केले तर नागरीकांचे हाल बेहाल होऊ नये म्हणून ते सर्व सेवक प्रामाणिकपणे रात्रंदिवस व आपल्या कुटुंबाचा तसेच प्रकृतीचा विचार न करता अविरत सेवा देत असतात. तेंव्हा या सेवेपोटी त्यांना देण्यात येणारे वेतन हे अतिशय तुटपुंजे असून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे क्रमप्राप्त व गरजेचे आहे. असे असताना त्यांना अतिशय कमी वेतन दिले जाणे म्हणजे त्यांचावर अन्यायच होत आहे. असे मत महापौर महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, व नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांनी व्यक्त केले.

जोपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलगिकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू असा इशारा तेथील काही कर्मचाऱ्यांनी बोलताना दिला. यावेळी नगरसेविका संगीता जाधव, राजश्री कणके, अंबिका पाटील, नगरसेविका मिनाक्षी कंपली, नगरसेविका रामेश्वरी,बिरू, नगरसेविका निर्मला तांबे, नगरसेवक नागेश भोगडे, विनायक विटकर, सरचिटणीस रुदरेश बोरामनी, किरण पवार, राजाभाऊ काकडे, शिवराज पवार, गणेश साखरे, प्रेम भोगडे, सिद्धू हिटनळी, धीरज कुंभार, सोमनाथ मेंडके, प्रथमेश आनंतकर, युवा मोर्चाचे पदाधिकारी  उपस्थित होते.

Web Title: BJP corporators along with the mayor and assembly leaders paid a visit to the ST workers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.