शहरं
Join us  
Trending Stories
1
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
2
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
3
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
4
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
5
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
6
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
7
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
8
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
9
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
10
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
11
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
12
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
13
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
14
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
15
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
16
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
17
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
18
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
19
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
20
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन

मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून, रुळावर जाळले टायर

By रूपेश हेळवे | Published: October 31, 2023 3:24 PM

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून रेल्वे रुळावर टायर जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.

रुपेश हेळवे

सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून रेल्वे रुळावर टायर जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. मंगळावारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रुळावरून दूर केले. त्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. 

मंगळवारी दुपारी खमितकर अपार्टमेंट परिसरात कार्यकर्त्यांनी मालवाहतूक रेल्वे गाडी अडवली. त्यानंतर घोषणाबाजी सुरू केली. शिवाय यावेळी आंदोलनकरणार्यांनी रुळावरच टायर ठेवून ते जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी टायर पेटवण्याच्या आतच सगळ्या टायरी बाहेर टाकत आंदोलकांना बाजूला केले. दरम्यान, काही आंदोलकांनी रेल्वेवर चढून आंदोलन सुरू केले.

दरम्यान, यावेळी मागील दिवसात १० समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आणि आजपर्यंत मराठा समाजातील ५० बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले. तरीही शासनाकडून गंभीरतेने कोणतेही पाऊल उचलण्यात येत नाही, असा आरोप करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. 

सरकारने लवकर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सत्ताधारी आमदार, खासदार व विरोधी पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्यांच्या युवकांचा अंत पाहू नका परिणाम गंभीर होतील असे मत तरुणांनी व्यक्त केले.