बोरामणी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरवर कारवाई करणार; जिल्हाधिकाºयांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:37 PM2020-06-17T16:37:09+5:302020-06-17T16:39:16+5:30
लोकमत आॅनलाइन बातमीची जिल्हाधिकाºयांकडून दखल; ‘त्या’ नर्सने दहा मिनिटे संवाद साधून मांडली कैफीयत
सोलापूर: कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ नर्सने व्हॉटसपवर पाठविलेल्या चिठ्ठीची दखल घेतलेल्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरवर कारवाई करण्याची शिफारश केली आहे.
लोकमत आॅनलाइनवर बुधवारी सकाळी व्हायरल झालेल्या या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेतली. अक्कलकोट येथे कोरोना साथीचा संसर्ग कमी करण्याच्या उपाययोजनेवर मंगळवारी बैठक घेतली. ही बैठक सुरू असतानाच त्या नर्सचा मला कॉला आला होता. बैठक थांबवून दहा मिनिटे मी त्या नर्सची कैफीयत ऐकून घेतली.
बोरामणी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर त्रास होत असल्याची संबंधित डॉक्टरास कल्पना दिली होती, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असे त्यांनी सांगितले. त्यावर याबाबत लेखी तक्रार करण्याची सूचना केल्यावर त्या नर्सने व्हॉटसपवर ती चिठ्ठी पाठविली, याची प्रिंट घेऊन संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना आदेश देणार असल्याचे शंभरकर यांनी स्पष्ट केले.
------------------
सुरक्षा साहित्याबाबत तक्रारी
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना पुरेसे सुरक्षा साहित्य दिले नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत मी स्वत: खातरजमा करणार आहे असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. जिल्हयात अक्कलकोट, बाशीतील संसर्ग चितांजनक आहे. कुंभारीतील संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
------------
पालकमंत्री आढावा घेणार
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय शंभरकर व विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर गुरूवारी सोलापूर दौºयावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शहर आणि जिल्ह्यातील स्थितीसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.