माझ्यासाठी दोन्ही बी चांगलंच/ कानोकानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:42+5:302020-12-11T04:48:42+5:30
मोहोळ तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात नियमितपणे विद्यार्थी व शिक्षकांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी सुरू होती. विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यावर शिक्षकांची तपासणी ...
मोहोळ तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात नियमितपणे विद्यार्थी व शिक्षकांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी सुरू होती. विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यावर शिक्षकांची तपासणी सुरू झाली. एका शिक्षकाची तपासणी करताना मात्र वेळ लागू लागला ते स्कॅनर दोन तीन वेळा कार्यान्वित केले तरी तापमान काही दाखवेना. हे लांबून पाहणाऱ्या इतर शिक्षकाच्या लक्षात आले. त्यांना वाटले हे पॉझिटिव्ह आहेत की काय? दोन तीन वेळा त्यांची तपासणी होतेय. ते गडबडीने त्यांच्याजवळ आले व विचारू लागले. इतक्यात त्या स्कॅनरने तापमान योग्य असल्याचे सांगितले. अन् सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मग एका सहकाऱ्याने त्या शिक्षकांना सांगितले की ‘काय राव आम्ही घाबरलो की ...तुम्हालापण टेन्शन आले असेल ना?’ असे विचारताच ते शिक्षक शांतपणे म्हणाले ‘माझ्यासाठी दोन्ही बी चांगलंच’; मात्र इतर शिक्षकांना याचा उलगडा होईना. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खुलासा केला, ‘हे पहा माझी तपासणी झाली काही आढळले नाही हे चांगलेच झाले आणि समजा आढळून आलेच तर मला १५ दिवसांची सुट्टी मिळाली असती अन् बरा होऊन पुन्हा आलोच असतो की’ त्यांच्या या बोलण्यावर कुणाला काय? बोलावे सुचेना. सगळेजण आपापल्या वर्गात निघून गेले...
- महेश कोटीवाले, वडवळ
--------------