वीटभट्ट्यांमुळे मंगळवेढा शहर सापडले प्रदूषणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:00+5:302021-03-17T04:23:00+5:30
सध्या बोराळे रोड, मरवडे रस्ता, सांगोला रस्ता, पाठखळ रोड, कचेरवाडी रोड, सोलापूर रोड याठिकाणी वीटभट्ट्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे. ...
सध्या बोराळे रोड, मरवडे रस्ता, सांगोला रस्ता, पाठखळ रोड, कचेरवाडी रोड, सोलापूर रोड याठिकाणी वीटभट्ट्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे. वीटभट्टीवर मोठ्या प्रमाणात धूळ असून, ही धूळ हवेद्वारे संपूर्ण शहरात पसरत आहे. सध्या या वीटभट्टीवर भीमा नदी काठावरील हजारो ब्रास माती आणली जाते. ही माती रात्री, सकाळी चोरून आणली जाते. वीटभट्टी मालकांकडून महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लावत जात आहे. या वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शहरात मोकाट फिरतात वीटभट्ट्यांवरील जनावरे
या वीटभट्ट्यांवर मुक्या जनावरांद्वारे माती वाहून नेणे, विटा टाकणे अशी कामे केली जातात. हीच मुकी जनावरे रात्री मंगळवेढा शहरामध्ये रस्त्याव मोकाट सोडली जातात. या मोकाट जनावरांमुळे अनेकांचे अपघात होऊन प्राण गेले आहेत. तसेच वीटभट्टीवर विनानंबरची वाहने माती टाकण्यासाठी वापरली जात आहेत. या मातीमुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वीटभट्ट्या त्वरित बंद कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो ओळी ::::::::::::::::::::::
मंगळवेढा येथे विनापरवाना मोठ्या संख्येने वीटभट्टी व्यवसाय सुरू असून, वीटभट्टीतून प्रदूषित हवा निघताना दिसत आहे.