अशी करा भाऊबीज साजरी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 03:13 PM2018-11-09T15:13:54+5:302018-11-09T15:15:23+5:30
सोलापूर : भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या ...
सोलापूर : भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वत:च्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो अशी परंपरा हिंदू संस्कृतीत आहे.
अशी करा भाऊबीज साजरी...
- या दिवशी भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.
- बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
- भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.
- एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.
- भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.
- ओवाळणी म्हणून भावाने बहिणीला पैसे, कापड, दागिना अशा वस्तु द्याव्यात
- अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीप दान करावे.