सोलापूर : आज वसुबारस भारतीय संस्कृतीत निसर्गाच्या पूजनाने वेगवेगळ्या सणाच्या रूपाने केले जाते. यात पशु,पक्षी वृक्ष यांना मोठे महत्त्व आहे. वसुबारस हा त्याचाच एक भाग आहे. या दिवशी गाईंना सजवून त्यांची पूजा केली जाते. गाईला पुरणपोळी, दही भात व बाजरीत गुळ कालवून नैवेद्य दाखवले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आज महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते गो मातेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महिला बालकल्याण सभापती रामेश्वर रामेश्वरी बिरू, नगरसेविका मेनका राठोड, राधिका पोसा, पुजारी नागराज शास्त्री रासकोंडा,डॉ.राजेंद्र गाजुल, राहुल नागमोते, भास्कर सामलेटी, सुरेश लिंगराज, विश्वनाथ काबणे, महादेव येळे, आदी मान्यवर उपस्थित होत.