दोघे वर्गमित्र हाकणार चपळगावचा गावकारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:05+5:302021-02-06T04:41:05+5:30
अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरूक असणारे म्हणून चपळगावची ओळख आहे. येथील राजकारणावर तालुक्याच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून असते. यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ...
अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरूक असणारे म्हणून चपळगावची ओळख आहे. येथील राजकारणावर तालुक्याच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून असते. यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन वर्गमित्रांनी सहकाऱ्यांसोबत एकत्र येत निवडणूक लढवली. संपूर्ण ग्रामस्थांनी वर्गमित्रांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवला आणि निवडणुकीत ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन ग्रामविकास पॅनलचे तेरापैकी बारा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आता सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण झाल्याने ठरविल्याप्रमाणे उद्योजक उमेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे हे दोघेही वर्गमित्र प्रत्येकी अडीच वर्षे याप्रमाणे गावकारभार हाकणार आहेत.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष चपळगाव आरक्षणाकडे लागले होते. उमेश पाटील व सिद्धाराम भंडारकवठे या दोघांनीही अडीच- अडीच वर्षे गावचा कारभार चालवायचा असा विचार विनिमय निवडणुकीपूर्वीच झाला आहे. उपसरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्याठिकाणी कोणाची वर्णी लागणार हे प्रत्यक्ष निवडीच्या वेळीच स्पष्ट होईल.
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी बसवराज बाणेगाव, महेश पाटील, रियाज पटेल, अप्पासाहेब पाटील, अंबणप्पा भंगे, प्रभाकर हंजगे, पांडुरंग चव्हाण, डाॅ. काशीनाथ उटगे, सुरेश सुरवसे यांच्यासह पॅनलप्रमुखांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी उमेश पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, अभिजित पाटील, परमेश्वर वाले, विलास कांबळे, रमेश अचलेरे, रविकांत शिरगुरे, चित्रकला कांबळे, मल्लीनाथ सोनार,
प्रदीप वाले, सायबण्णा म्हमाणे, गणेश कोळी, महिबूब तांबोळी, श्रावण गजधाने उपस्थित होते.