रस्त्यावरील चारी, नुकसान करते भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:04+5:302021-07-26T04:22:04+5:30

या रस्त्यावर एका नामांकित कंपनीने चारी घेतली आहे. ही चारी घेताना संबंधित विभागाची परवानगी घेतली आहे की नाही, हा ...

Chari on the road, does heavy damage | रस्त्यावरील चारी, नुकसान करते भारी

रस्त्यावरील चारी, नुकसान करते भारी

Next

या रस्त्यावर एका नामांकित कंपनीने चारी घेतली आहे. ही चारी घेताना संबंधित विभागाची परवानगी घेतली आहे की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. परवानगी घेतली असेल तर त्या रस्त्याची डागडुजी संबंधित विभागाने का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने ती चारी आरली असल्याने मोठा खड्डा तयार आहे.

२३ जुलै रोजी ४ वाजण्याच्या सुमारास पशुखाद्य घेऊन निघालेले वाहन त्या चारीत अडकून वाहनाचे नुकसान तर झालेच, शिवाय तीन तास रस्त्यावर अडकल्याने येणाऱ्या वाहनांना तेथून जाणे-येणे मुश्कील झाले होते. इतर काही वाहनांचेही नुकसान झाले. त्यामुळे प्रवाशांमधून संबंधित विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. नेमतवाडी-करकंब रस्त्याची दुरुस्ती एकवेळ राहूद्या किमान रस्त्यावरील खड्डे तरी बुजवा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

तीन तास टेम्पो रस्त्यावर

सतत आठ दिवस पावसाची रिपरिप झाल्यामुळे रस्त्यावर चारीमध्ये मोठा खड्डा पडला. यावेळी पशुखाद्य घेऊन निघालेला टेम्पो खड्ड्यात आदळला आणि टेम्पोचा घोटाळा झाला. यामुळे टेम्पो जवळपास तीन तास रस्त्यावरच अडकून पडला होता. यामुळे इतर चारचाकी वाहने तेथून काढताना मोठी पंचाईत झाली होती. परिणामी अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

कोट ::::::::::::::::::::::

रस्त्यावर असलेल्या चारीमध्ये मोठे वाहन अडकल्यामुळे माझी गाडी तेथून काढताना दमछाक झाली. संबंधित प्रशासनाने रस्त्यावरील चाऱ्या आणि खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत.

- डॉ. संतोष वलगे

प्रवासी, नांदोरे

Web Title: Chari on the road, does heavy damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.