‘सिध्देश्वर’ च्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर

By appasaheb.patil | Published: December 13, 2019 12:36 PM2019-12-13T12:36:13+5:302019-12-13T12:49:27+5:30

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

The chimney of 'Siddharshwar' is now after the session | ‘सिध्देश्वर’ च्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर

‘सिध्देश्वर’ च्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर

Next
ठळक मुद्दे- सोलापूर विमानसेवा सुरू होण्यास पुन्हा अडथळा- नगरविकास खात्याने अहवाल मागविल्यामुळे चिमणीचे पाडकाम लांबणीवर- अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारचे पाडकाम होणार नाही

सोलापूर : सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर होणार आहे़ नगरविकास खात्याने चिमणी पाडकामाबाबत अहवाल मागविल्यामुळे चिमणीचे पाडकाम लांबणीवर गेल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चिमणी पाडकामासंदर्भातील अहवाल राज्याच्या नगरविकास विभागाने मागितला असून तो त्यांना देण्यात आला आहे. नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल़ आमच्या कॉन्ट्रक्टरच्या दिरंगाईमुळे चिमणी पाडकामाला वेळ लागत आहे मात्र आता चिमणीच्या पाडकामात कोणत्याही प्रकारची हयगत केली जाणार नाही़ अधिवेशन कालावधीत चिमणी पाडकामाचे काम होणार नाही, अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल  असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.


 

Web Title: The chimney of 'Siddharshwar' is now after the session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.