सोलापूर : सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या चिमणीचे पाडकाम आता अधिवेशनानंतर होणार आहे़ नगरविकास खात्याने चिमणी पाडकामाबाबत अहवाल मागविल्यामुळे चिमणीचे पाडकाम लांबणीवर गेल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिमणी पाडकामासंदर्भातील अहवाल राज्याच्या नगरविकास विभागाने मागितला असून तो त्यांना देण्यात आला आहे. नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल़ आमच्या कॉन्ट्रक्टरच्या दिरंगाईमुळे चिमणी पाडकामाला वेळ लागत आहे मात्र आता चिमणीच्या पाडकामात कोणत्याही प्रकारची हयगत केली जाणार नाही़ अधिवेशन कालावधीत चिमणी पाडकामाचे काम होणार नाही, अधिवेशनानंतर चिमणीचे पाडकाम होईल असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.