सोलापूर विमान सेवेला अडथळा ठरणारी कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशन ची चिमणी पाडण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सभेत शुक्रवारी बहुमताने मंजुरी देण्यात आली.
महापालिकेची एप्रिल महिन्याची तहकूब सभा महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेला सभागृहनेते शिवानंद पाटील गटनेते आनंद चंदनशिवे चेतन नरोटे यांच्यासह इतर नगरसेवकांनी ऑनलाइन हजेरी लावली सभेत आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांच्या इमारती धूळखात पडून आहेत या इमारती इतर संस्थांना भाड्याने देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी प्रस्तावाचे अवलोकन केले.
ज्या शाळा 50 वर्षांपेक्षाजास्त इतिहासाच्या असतील अशा शाळांना इमारती भाड्याने देण्यास आयुक्तांना अधिकार देण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीच्या विषयावर वादळी चर्चा झाली. चर्चेअंती चिमणी पाडकामास बहुमताने मंजुरी देण्यात येत असल्याचे महापौर यन्नम यांनी जाहीर केले.
सिद्धेश्वर साखर कारखान्याने कॉजनरेशन साठी बांधलेली चिमणी महापालिकेने बेकायदा ठरवली आहे या चिमणीचा सोलापूर विमान सेवेला अडथळा होत आहे न्यायालयीन प्रकरणानंतर चिमणी पाडकामावर टोलवाटोलवी झाली. अखेर मनपा प्रशासनाने हे प्रकरण सर्वसाधारण सभेसमोर पाठवले होते. यावर वादळी चर्चा होऊन चिमणी पाडकाम आला बहुमताने मंजुरी दिली आहे.