लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रूई-जाधववस्ती रस्ता केला जात आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून माढा तालुक्यातील रुई, घोटी, तुळशी व उपळाई या गावांकरिता मोठ्या प्रमाणावर निधी आल्याचे जाहीर केले. यावेळी कार्यकारी उपअभियंता उंबरगे, सभापती संजय पाटील-भिमानगरकर, तालुका पंचायत सदस्य धनंजय जवळगे, जिल्हा परिषद सदस्य बंडू नाना ढवळे, माजी सरपंच प्रदीप गायकवाड, रूईचे सरपंच तात्यासाहेब झिंजे, रामभाऊ शिंदे, परमेश्वर देशमुख, कारखान्याचे संचालक वेताळ जाधव, पांडुरंग घाडगे, सचिन देशमुख, रांझणीचे सरपंच पांडुरंग माने, हरिभाऊ माने, तानाजी सलगर, समाधान वाघमारे, कल्याण वाघमारे, गणेश सोलंकर, पोपट कोळेकर, व्यंकट झरक, बाळू चंदनकर, विशाल साठे, प्रभाकर जाधव उपस्थित होते.
----
फोटाे : २९ भीमानगर
रूई-जाधववस्ती रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना शिवाजीराव पाटील, रणजितसिंह शिंदे, तात्यासाहेब झिंजे, प्रदीप गायकवाड.