सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ नर्सने व्हॉटसपवर पाठविलेल्या चिठ्ठीची दखल जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेत संबंधितांना तिची काळजी घेण्याची सूचना केली.
बोरामणी प्राथिमक आरोग्य केंद्रातील नर्स तुळजापूर रुग्णालयात उपचारास दाखल झाल्यावर तिचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. रुग्णालयात अॅडमिट असतानाच तिने जिल्हाधिकाºयांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार तिने एका कागदावर घडलेला प्रकार लिहून व्हॉटसपवर पाठविला. जिल्हाधिकाºयांनी व्हॉटसअपवर तिने पाठविलेली चिठ्ठी वाचली. आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य वेळेवर पुरविले गेले नाही. साहित्य नसल्याचे आपल्याला बाधा झाल्याचे नमूद केले आहे. आरोग्य कर्मचाºयांना दोन महिन्यापासून पगार नाही. आता माझ्या सर्व कुटुंबियास क्वारंटाईन केले आहे. माझ्याकडे औषधाला पैसे नाहीत, उपचाराची व्यवस्था व्हावी अशी विनंती केल्याचे दिसून आले. व्हॉटसपवर आलेली ही चिठ्ठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वाचली व तातडीने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व तुळजापूरच्या प्रांत अधिकाºयांना संपर्क साधून त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था करण्याचा सूचना केल्या.