चांगल्या-वाईट माणसांचा संगम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:45 PM2018-12-07T15:45:00+5:302018-12-07T15:45:37+5:30
चांगल्या-वाईट माणसांचा संगम असणाºया या दुनियादारीत जीवन जगत असताना चार प्रकारचे आंधळे माझ्या निदर्शनास आले़ यातील तीन आंधळ्यांना डोळे ...
चांगल्या-वाईट माणसांचा संगम असणाºया या दुनियादारीत जीवन जगत असताना चार प्रकारचे आंधळे माझ्या निदर्शनास आले़ यातील तीन आंधळ्यांना डोळे असूनही ते अंधच असतात आणि पहिला मात्र जन्मत:च आंधळा असतो़ ते चार आंधळे असे आहेत - जन्मांध, कामांध, लोभी मनुष्य आणि स्वत:ला फारच शहाणा समजणारा मनुष्य़ या चारही आंधळ्यांचे वैशिष्ट्यप्रकारही मी जवळून अनुभवले आणि त्यासाठीच हा लेखनप्रपंच.
यातील पहिला जो आंधळा आहे तो जन्मत:च अंध असतो़ ‘ठेविले अनंते तैसेची रहावे आणि चित्ती असो द्यावे समाधान।।’ या उक्तीप्रमाणे तो जीवन जगत असतो़ देवाने जे काही त्याला दिलंय त्यातच तो समाधान मानून उपजीविका करण्याची त्याची वृत्ती असते़ तो जन्मत:च अंध असल्याने त्याचे जीवन मर्यादित आणि चाकोरीबद्ध असते़ पैसा मोजण्याचं नाणं आणि नोटा ओळखण्याचं, रस्ता ओळखण्याचं, माणसं ओळखण्याचं त्याचं एक विशिष्ट तंत्र असतं.
त्या तंत्रानुसार ते आपली जीवनगाथा गात असतात़ दुसºया प्रकारच्या आंधळ्याला (कामांध) डोळे असतात, पण तरीही तो विषयवासनेत आंधळा झालेला असतो़ मनामध्ये सारखं तो लैंगिक विषयाचं चिंतन करत असतो़ त्याचं डोकं म्हणजे सैतानाचं वास्तव्य असतं़ केव्हाही पाहा तो अस्थिर असल्याचं आपल्या निदर्शनास येतं़ तो मुली, महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहत असतो़ विषयवासनेची पूर्ती करताना त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहत नाही़ आपण कोणावर अन्याय, अत्याचार करतोय याच्याशी त्याला देणं-घेणं नसतं. त्याला फक्त वासनापूर्ती हवी असते़ तरुण मुलींकडे वाईट नजरेने पाहणे आणि संधी मिळताच वाईट हेतूनं स्पर्श करणे हा त्याचा स्वभावधर्मच असतो, असा विषयांध मनुष्य कधीही आपल्या पत्नीशी, कुटुंबाशी एकनिष्ठ नसतो़ वासनापूर्ती झाली तरी तो नवनवीन तरुणींच्या शोधात असतो़ कामासाठी नकार देणाºया मुलीचा खून करायलाही तो मागे-पुढे पाहणार नाही़ ही सगळी विषयांध माणसाची लक्षणे म्हणून मला सांगता येतील़ असो. आता आपण पुढील आंधळ्याकडे वळू या!!
तर वाचकहो पुढील आंधळा म्हणजे हावरट मनुष्य़ या मनुष्याला दोन्ही डोळे असूनही तो आंधळा असतो. तो नानाविध गोष्टींच्या मोहापायी वेडापिसा झालेला असतो़ धनाची अत्यंत लालसा असणारे, ते कमावण्याच्या नादात आपलं संपूर्ण शरीर धुळीस मिळवतात़ त्यांना शरीरापेक्षा धन महत्त्वाचं वाटतं़ संपत्तीच्या मोहात अंध झालेला मनुष्य संपत्तीसाठी एखाद्या निष्पापाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाही.
स्वत:हून एखाद्या मुलीच्या अथवा तरुणीच्या मागे लागणं आणि तिच्याकडे प्रेमाची मागणी करणं, हा त्या स्त्रीविषयी असलेला मोहच आहे ना? अशी प्रेमांध माणसं स्वत:च्या पत्नीचाही काटा काढायला मागे-पुढे पाहणार नाहीत़ सत्तेसाठी, खुर्चीसाठी हपापलेल्या राजकारण्यांना केवळ खुर्ची दिसत असते़ देशाचा, आपल्या नगराचा विकास त्यांना दिसत नसतो़ किती शेतकºयांनी आत्महत्या केली, हे त्यांना दिसत नाही़ दहावी-बारावीसुद्धा पास न झालेली ही बिनडोक राजकारणी हे सत्तांध झाल्यामुळेच त्यांना देशाचा विकास दिसत नसतो़ त्यांच्या हातून देशसेवा, देशविकास कधीच घडणार नाही, याची हमी मी देतो़ वाचकहो लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचा हावरटपणा हा मनुष्याच्या हानीस कारणीभूत ठरतो.
चौथा अन् शेवटचा अंध मनुष्य म्हणजे स्वत:ला खूपच शहाणा आणि विद्वान समजणारा मनुष्य. हा मनुष्य इतरांना तुच्छ मानतो़ इतरांचा तिरस्कार करतो. या जगात मी एकटाच खूप शहाणा आहे़ इतर सारे मूर्ख आहेत, असा समज त्याचा असतो़ म्हणून इतरांनी बोललेले त्यास पटत नाही़ अशा मनुष्याला चांगलंही कळत नाही आणि वाईटही कळत नाही़ रेडिओवरच्या एका लोकगाण्यामध्ये मी ऐकले आहे़ एकाहून एक चढी जगामंधी़़़ थोरपणाला मिरवू नको़़़ याचं भान त्या मनुष्याला नसतं. इतरांचं म्हणणं नेहमीच खोडून काढण्याचा त्याचा प्रयत्न असतो़ या चार प्रकारात आपण कधीही जाऊ नये, हीच अपेक्षा.
-चिदानंद चाबुकस्वार
(लेखक विवेकानंद विद्यालयात शिक्षक आहेत)