दिलासादायक; राज्यात अहमदनगर बाजार समितीत कांद्याला पाच हजारी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:58 PM2021-02-22T16:58:41+5:302021-02-22T16:59:59+5:30

सर्वाधिक दर : राज्यात सर्वच बाजार समित्यामध्ये विकतोय चार हजाराने कांदा

Comforting; Five thousand price for onion in Ahmednagar market committee in the state |  दिलासादायक; राज्यात अहमदनगर बाजार समितीत कांद्याला पाच हजारी भाव

 दिलासादायक; राज्यात अहमदनगर बाजार समितीत कांद्याला पाच हजारी भाव

googlenewsNext

सोलापूर: राज्यात सर्वच बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत असल्याचे दरात सुधारणा होत आहे. दरम्यान अहमदनगर बाजार समितीत शनिवारी क्विंटलला सर्वाधिक पाच हजाराचा भाव मिळाला.

यावर्षी काही जिल्ह्यात सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे कांदा पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हा फटका सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसला होता. त्यामुळे सोलापूरसह काही जिल्ह्यातील कांद्याचे पीक शेतकर्यांच्या हाती लागले नाही. अशातही औषधावर मोठा खर्च करुन शेतकर्यांनी कांदा आणला. उशिराने लागवड झालेला कांदा हाती लागला माञ हे क्षेत्र फारच कमी आहे.

शनिवारी अहमदनगर बाजार समितीत २३ हजार ८९२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कमीतकमी एक हजार तर सर्वाधिक पाच हजाराचा भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत क्विंटल ला २४०० ते ४२९९ रुपये तर ३९५१ रुपये, उमराणा बाजार समितीत ११०० ते ४२०० तर सरासरी ३६०० रुपये, लासलगाव ८ हजार १७२ क्विंटल आवक तर १३०० ते ४३०० तर सरासरी चार हजार, चांदवड बाजार समितीत १३०० ते ३९२१ रुपये तर सरासरी ३७०० रुपये इतका दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल २००ते ४५०० रुपये तर सरासरी २८०० रुपयाने कांदा विकला.२७ हजार ८८५ क्विंटल कांद्याची आवक झाली. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही चांगला दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक

राज्यात अहमदनगर व सोलापूर बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होते. माञ अहमदनगर बाजार समितीत कमीतकमी दर एक हजारापेक्षा कमी होत नाही. सोलापूर बाजार समितीत १०० रुपयापासुन कांद्याचे लिलाव होतो. सोलापूर बाजार समितीत दोन हजार रुपयापर्य॔तच मोठ्या प्रमाणावर कांद्याला दर मिळतो. दोन हजारापेक्षा अधिक दर फारच कमी कांद्याला मिळतो. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत कांद्याला सरासरी दर सतत कमी असतो.

Web Title: Comforting; Five thousand price for onion in Ahmednagar market committee in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.